आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म संमेलनाचे आज उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
बिहार: आज बिहारमधील राजगीर येथे तीन दिवसीय चौथ्या आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. राजगीर येथील नालंदा येथे हे संमेलन आयोजित केले गेले आहे. यावर्षीच्या या संमेलनाचा मुख्य विषय ‘धर्म आणि राजकारण’ हा आहे.
 
 
धर्म आणि राजकारण या विषयावर सध्या सामाजिक वाद सुरु असल्याने यावेळच्या संमेलनाचा विषय ‘धर्म आणि राजकारण’ हा निवडण्यात आला आहे. या विषयावर या संमेलनामध्ये चर्चा, व्याख्याने घेतली जाणार आहेत. यामुळे धर्म आणि राजकारण याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे याचा अंदाज नागरिकांना येणार आहे.
 
 
धर्म आणि राजकारण यावरील नागरिकांची समज वाढावी तसेच यावर नागरिकांनी विचार करावा या उद्देशाने हे संमेलन आयोजित केले जाणार आहे. चर्चा, वादविवाद, व्याख्याने अशा स्वरूपाचे हे संमेलन असणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@