आयसीआयसीआय बँकेला पालिकेच्या मालमत्ता कर विभागाची नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |

२१ दिवसांत दीड करोड भरण्याचे आदेश

 

 
 
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ३ येथील चौपडा कोर्ट परिसरातील आयसीआयसीआय बँकेची शाखा असलेल्या वास्तूचे चुकीच्या पद्धतीने कर निर्धारण झाल्याने तब्बल दीड करोड रुपये २१ दिवसांत पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याची नोटीस पालिका प्रशासनाने मालमत्ताधारकाला बजावली आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास बँकेच्या शाखेला सील ठोकणार असल्याचे कर निर्धारक आणि संकलक विजय मंगलानी यांनी सांगितले.
 
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील असंख्य मालमत्ता या भाडेतत्त्वावर बहुउद्देशीय बँका व संस्थांना देण्यात आल्या आहेत. या मालमत्ताकराच्या कर निर्धारणामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याची बाब पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कर निर्धारणासाठी विजय मंगलानी यांची नेमणूक केली. त्यांनी आतापर्यंत विविध बँकांच्या ६० शाखा, ३० एटीएमयांचा सर्व्हे केला असून मोबाईल टॉवरचा सर्व्हे चालू आहे. तीन दिवसांपूर्वी मंगलानी यांनी आयसीआयसीआय बँकेची शाखा असलेल्या अनिल बालानी यांच्या मालमत्तेला नोटीस बजावली आहे.
 
याबाबत विजय मंगलानी यांनी सांगितले की, बँकेची शाखा २००८ पासून सदर ठिकाणी असताना कर निर्धारण हे २०११ पासून चालू आहे. या मालमत्तेत आयसीआयसीआय बँक ही २२०० चौरस फुटात बसलेली असताना अवघ्या एक हजार चौरस फूट क्षेत्राचे करनिर्धारण करण्यात आले आहे. यामुळे वर्षाला २५ लाख रुपये बसणारा कर अवघा अडीच लाख झाला. याबाबतचा दंड आणि थकीत कर तात्काळ अदा करण्यासाठी १ करोड ५९ लाख रुपयांची नोटीस अर्जुन बलानी यांना पाठविण्यात आली असल्याचे मंगलानी यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@