वर्षाअखेर महाराष्ट्र डिजिटल होणार : रवींद्र चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |

दिल्लीतील महाराष्ट्र केंद्राला दिली भेट

 
 
 
 
 
ठाणे : राज्यातील सर्व ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र व सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून वर्षअखेर राज्य डिजिटल होईल, असा विश्वास, राज्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. राज्यमंत्री चव्हाण यांनी दिल्लीतील महाराष्ट्र केंद्राला भेट दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री चव्हाण यांनी ही माहिती दिली.
 
यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांनी राज्यमंत्री चव्हाण यांचे पुष्पगुच्छ तसेच कार्यालयातील प्रकाशने भेट देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकार निलेश कुलकर्णी, विनीत वाही, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 
राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले, ’’भारतनेट प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील १२ हजारहून अधिक ग्रामपंचायती ब्रॉडबॅन्डने जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र आणि शाळा वर्षअखेर इंटरनेटने जोडल्या जातील. ’’शासनाच्या कामांना ‘मपकें’मार्फत व्यापक प्रसिद्धी देशाच्या राजधानीत असणारे महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी दिली जात असल्याचे कौतुक राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी केले. कार्यालयातील समाज माध्यमांद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क व प्रसिद्धीचे काम कार्यालयाद्वारे अतिशय चांगल्या तर्‍हेने केले जात असल्याची प्रशंसा चव्हाण यांनी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@