आंचल ठाकूर हिला हरियाणा सरकारकडून बक्षीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
तुर्की येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत भारताच्या आंचल ठाकूर हिने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकाविले आहे. आंचल ठाकूर हिने या स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले असून हे पदक पटकाविणारी ती भारताची पहिली महिला आहे. यासाठी हरियाणा सरकारने आंचलला पाच लाखाचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तुर्कीमधील एरझूरम आंतरराष्ट्रीय स्कीइंग महासंघाद्वारे आयोजित ॲल्पाइन एज ३२०० चौरस स्पर्धेत आंचल ठाकूर हिने हे पदक मिळविले आहे. ही भारतासाठी खूपच महत्वाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल ट्वीटरवरून आंचल हिला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
स्किइंग हा बर्फावरती खेळला जाणारा खेळ आहे ज्यात स्कीजचा वापर केला जातो. स्कीज् बरोबर बूट वापरले जातात. स्किइंग हा खेळ दोन प्रकारात विभागता येतो. नॅार्डिक स्किइंग हा त्यातला सर्वात जुना प्रकार जो स्कँडिनेवियामध्ये सुरु झाला. तर दुसरा प्रकार ॲल्पाइन स्किइंग हा आल्प पर्वतात सुरु झाला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@