टिटवाळ्यामधील प्रसिद्ध मूर्तिकार रवींद्र (भाई) गोडांबे अनंतात विलीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
टिटवाळा : टिटवाळा येथील प्रसिद्ध मूर्तिकार रवींद्र (भाई)गोडांबे यांचे मंगळवारी दि. ९ अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८४ वर्षे होते.
 
त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या हातातील कौशल्याने त्यांनी घडवलेल्या मूर्तींना देशासह परदेशातदेखील मोठी मागणी होती. लहानपणापासूनच मूर्तिकलेत आवड असणार्‍या भाई यांनी कल्याणमधील आपले गुरू विठ्ठल ईश्वाद यांच्याकडे काम करत भरपूर अनुभव घेतला. त्यानंतर ५० वर्षांपूर्वी त्यांनी टिटवाळा येथे गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.
 
मूर्तिकलेच्या व्यवसायाची टिटवाळ्यात मुहूर्तमेढ करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. अनेक मूर्ती घडविणार्‍या कलावंतांना प्रोत्साहन देत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. लहान लहान मूर्ती बनवत असताना त्यांनी गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांच्या वैशिष्ट्यामुळे सर्वत्र त्यांचे नाव होऊ लागले. त्यांनी बनविलेल्या अनेक मूर्तींना पारितोषिके मिळालेली आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@