मुरबाड पंचायत समितीवर भाजपने फडकविला झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 

 
 
मुरबाड : मुरबाड तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपने १६ पैकी ११ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले होते.
 
सोमवारी ८ जानेवारी २०१८ रोजी सभापती व उपसभापती निवडणुकीत भाजपने दोन्ही ठिकाणी झेंडा फडकविला आहे. त्यामध्ये सभापतीपदी जनार्दन पादीर तर उपसभापतीपदी सीमा घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुकीचे कामपिठासन अधिकारी तथा तहसीलदार सचिन चौधरी यांनी पाहिले.
 
बर्‍याच वर्षानंतर २०१८ मध्ये भाजपने मुरबाड पंचायत समितीवर आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने भाजपचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे तालुक्यात होणार्‍या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांच्या विकासाचे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाला भाजपला रोखता आले नाही, हे मात्र खात्रीशीर आहे. तसेच नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे आमदार किसन कथोरे यांनी अभिनंदन केले.
 
@@AUTHORINFO_V1@@