नेपाळमध्ये थंडीचा कहर, २७ नागरिकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |

 
काठमांडू : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये सध्या थंडी प्रचंड कहर केला आहे. नेपाळमध्ये पडलेल्या थंडीमुळे काल दिवसभरात नेपाळमध्ये १२ नागरिकांचा मृत्यू झाला असून नेपाळमध्ये आतापर्यंत २७ नागरिकांना थंडीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून नेपाळच्या तापमानाने कमालीचा निच्चांक गाठला आहे.  दिवसा येथील कमाल तापमान ह्हे १३ अंश सेल्सिअस एवढे तर रात्री ते ४ ते २ अंश सेल्सिअस एवढे खाली येत आहे. त्यामुळे येथील वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याभरामध्येच २७ नागरिकांना या भीषण थंडीमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

नेपाळच्या या थंडीचा परिणाम उत्तर भारतामध्ये देखील पाहायला मिळत आहे. भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये पारा कमालीचा खाली घसरला आहे. थंडीमुळे हरियाणा सरकारने येत्या १४ तारखेपर्यंत शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
@@AUTHORINFO_V1@@