केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |

 
मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी-बारावीच्या मुख्य लेखी परीक्षा ५ मार्चपासून सुरू होणार आहेत. आज सीबीएसईकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे.
 
परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळा क्लासेस मध्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात होणार आहे.
 
सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा ५ मार्तला सुरु होतील, तसेच या परीक्षा ५ एप्रिल पर्यंत चालतील. या परीक्षेत एकूण ९५ हुन अधिक विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलगू आदी भाषांसह फेंच, जर्मन आदी भाषा विषयांचा देखील समावेश आहे. या परीक्षेला देशभरातून सुमारे १७ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार असल्याची माहिती सीबीएसईतर्फे देण्यात आली आहे.
 
सीबीएसईच्या बारावीची परीक्षा ही ५ मार्चलाच सुरू होणार असून ती १२ एप्रिलपर्यंत चालेल. यात १६९ विषयांच्या परीक्षा होतील. यासंदर्भात मंडळाने आपल्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करुन दिली असून, प्रत्येक परीक्षा केंद्रालाही त्यासाठीची माहिती देण्यात आली असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@