वर्ल्ड बँक फोरमकडून भारत सरकारचे पुन्हा एकदा कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |



नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास' या मोदी सरकारच्या नीतीचे वर्ल्ड बँक फोरमकडून पुन्हा एकदा कौतुक करण्यात आले आहे. भारताने गेल्या वर्षात बदलेल्या आपल्या आर्थिक आणि परदेश नीतीमुळे जगात भारताची प्रतिमा ही सर्व सर्वव्यापी अशी बनत चालली असून भारताने आता जागतिक स्तरावर नेतृत्वासाठी पुढे आले पाहिजे' असे मत वर्ल्ड बँक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉउस श्वाब यांनी व्यक्त केले आहे.

श्वाब यांनी काल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर श्वाब यांनी नरेंद्र मोदी डॉट कॉम या संकेतस्थळावर जागतिक स्तरावर भारताला असलेल्या संधी या विषयी एक लेख लिहिलेला आहे. या लेखामध्ये त्यांनी भारत सरकारच्या नव्या धोरणांचे कौतुक केले असून यामुळे भारताची जागतिक प्रतिमा ही झपाट्याने बदलली आहे. तसेच मोदी सरकारने स्वीकारलेल्या नव्या नीतींचा भारताला भविष्यात खूप मोठा फायदा होणार असून भारतीय अर्थ व्यवस्थाही अधिक मजबूत होणार आहे, असे त्यांनी आपल्या लेखामध्ये म्हटले आहे.

'भारत सरकारच्या सबका साथ सबका साथ विकास या योजनेमुळे जगभरातील देशांमध्ये भारताविषयी प्रचंड आदर आणि भारता विषयी आशावाद निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताने जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले पाहिजे.' असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. तसेच जागतिक नेतृत्व करण्यासाठी सध्याचा काळ हा भारतासाठी अत्यंत अनुकूल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@