राजस्थानमध्ये 'पद्मावत' प्रदर्शित होणार नाही : वसुंधरा राजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |

 
जयपूर : संजय लीला भंसाली दिग्दर्शित 'पद्मावत' सिनेमा कधी प्रदर्शित होणरा याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे, मात्र राजस्थानच्या चाहत्यांना हा चित्रपट बघण्यासाठी दुसऱ्या राज्यांमध्ये जावे लागणार असे दिसते. त्याचे कारण म्हणजे राजस्थानमध्ये पद्मावत प्रदर्शित करण्यात येणार नाही, असा आदेश राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दिला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये पद्मावत प्रदर्शित करण्यात येणार नाही.
 
त्यामुळे आता राजस्थानातील कोणत्याही सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. राजस्थान येथील जनतेच्या भावनांचा विचार करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे वसुंधरा राजे यांनी स्पष्ट केले आहे.
 
महाराणी पद्मिनीचे बलिदान हे राज्याच्या मान-सन्मानाबरोबर आणि गौरवासोबत जोडले गेले आहे. त्यामुळे राणी पद्मिनी आमच्यासाठी केवळ इतिहासाचा एक अध्याय नाही, तर आमचा स्वाभिमान आहे. असेही त्या म्हणाल्या आहेत.
 
‘पद्मावत’ २५ जनवरीला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे, असे म्हटले जात आहे. मात्र या बाबत अजून चित्रपटाच्या प्रमुख लोकांकडून माहिती मिळालेली नाही. ‘पद्मावती’वरील वादानंतर या सिनेमाचे नाव बदलून ‘पदमावत’ करण्यात यावं असं सेन्सॉर बोर्डने आदेश दिले आहेत.. मात्र वॉयकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि संजय लीला भंसाली यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
@@AUTHORINFO_V1@@