भीमाकोरेगाव प्रकरणी ४३ जणांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |


पुणे : भीमाकोरेगाव येथे जमावावर झालेल्या दगडफेकप्रकरणी ४३ संशयित आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये तीन अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश असून सर्वांसंबंधी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भीमाकोरेगाव, आसपासचा परिसरातील गावे आणि पुण्यामधून या आरोपींना अटक करण्यात आले असून जमावावर झालेल्या दगडफेकी विषयी त्यांची चौकशी केली जात आहे.

भीमाकोरेगाव येथील दगडफेकीची चौकशी तसेच यामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. यासाठी भीमाकोरेगाव आणि स्थानिक नागरिकांकडून राज्य सरकारकडे सातत्याने मागणी केली जात आहे. ग्रामस्थांच्या मागणीमुळे सरकारने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यातून आसपासच्या भागातून आणि पुण्यामधून या ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच याविषयची सर्व चौकशी लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

१ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जमावावर झालेल्या दगडफेकीनंतर राज्यात उसळलेल्या जनक्षोभामुळे राज्याचे प्रचंड नुकसान झाले होते. तसेच राज्यभरातील नागरिकांच्या मागणीनंतर सरकारने या घटनेची सखोल आणि गांभीर्याने तपास करण्याचे आदेश दिले होते. तसेच या गदारोळामध्ये नुकसान झालेल्या गोष्टींचा पंचनामा करण्याचा देखील आदेश दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@