कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासाठी चौकशी समिती नेमा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |

कलबुर्गी यांच्या पत्नीची सर्वो. न्यायालयात याचिका 




नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार एम.एम कलबुर्गी यांच्या हत्येसाठी चौकशी समिती बसवण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या संबंधी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे.

'कलबुर्गी यांच्या हत्येला दोन वर्ष ओलांडून देखील अद्याप त्यांच्या मारेकारांचा शोध लागलेला नाही. सरकार देखील याकडे अधिक गांभीर्याने पाहत नाही', असा आरोप कलबुर्गी यांच्या पत्नीने आपल्या याचिकेत केलेला आहे. तसेच कलबुर्गी, पानसरे आणि दाभोळकर यांच्या हत्येमध्ये बऱ्यापैकी साम्य असून त्यांचे मारेकरी एकच असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी उममादेवी यांनी केली आहे.

उमादेवी यांच्या या याचिकेनंतर न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून या संबंधी चौकशी समिती नेमण्याविषयी विचारणा केली आहे. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासासंबंधी सरकार सध्या काय करत आहे? याची माहिती न्यायालयासमोर द्यावी. तसेच उमादेवी यांच्या मागणी संबंधी देखील सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@