मोर्णा नदी स्वच्छतेसाठी अकोलाकरांची नवी मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |



अकोला :
अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी येत्या शनिवारी अकोलकरांनी एक नवीन मोहीम सुरु करण्यात येत असून या मोहीमध्ये सर्व अकोलकरांनी मोठ्या संख्याने सामील व्हावे, असे आवाहन अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. तसेच मोर्णा नदी स्वच्छता अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या नियोजनाविषयी देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.

मोर्णा नदी अकोला जिल्ह्यातून वाहत आहे, हे खरे तर अकोल्याचे भाग्य आहे. परंतु आज ही नदी अस्वच्छ झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांशी चर्चा करून नदीच्या स्वच्छतेसाठी मोहीमचे कल्पना मांडण्यात आली व त्याला नागरिकांनी देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी येत्या शनिवारी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या संख्याने सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यानंतर या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या नियोजनांची माहिती त्यांनी दिली व नागरिकांनी शनिवारी सकाळी ८ वाजता नदी किनारी जमा व्हावे, अशी सूचना त्यांनी दिली. नागरिक तसेच अभियानात सहभागी होणाऱ्या सेवाभावी संस्थाना देखील या संबंधी सूचना दिल्या.
@@AUTHORINFO_V1@@