आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतून विराटची घसरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
दक्षिण आफ्रिका यांच्यासोबत सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताला मिळालेल्या अपयशानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतून स्थान घसरले आहे. या क्रमवारीतून विराट कोहली तब्बल १३ अंकांनी घसरून आता तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
 
 
क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याचे स्थान देखील पाचव्या क्रमांकावर आले असून गोलंदाज रवींद्र जडेजा आणि अश्विन यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. या क्रमवारीत विराट कोहली याचे प्रथम क्रमांकावर स्थान होते. मात्र पहिल्या कसोटी सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेसोबत हरल्यामुळे विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा याचे स्थान घसरले आहे.
 
 
चेतेश्वर पुजारा हा देखील २५ अंकांनी खाली घसरला आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारी आता पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू कैगिसो रबाडा हा विराजमान झाला आहे. दक्षिण आफ्रिकेसोबत हरल्यामुळे भारताला अशा बऱ्याच गोष्टींमध्ये नुकसान होणार असल्याचे म्हटले जात आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@