राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नंदुरबारच्या रोशनी पाटीलला कांस्य पदक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
  
 
 
 
नंदुरबार : सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याची खेळाडू रोशनी पाटील हिने कांस्य पदक पटकवले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
 
 
 
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने व सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने १६ वी युथ मुली राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन सातारा येथील तालीम संघ मैदान येथे करण्यात आले होते. त्यात नंदुरबार जिल्हा बॉक्सिंग संघटनेची खेळाडू रोशनी पाटील हिने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रोशनी पाटीलने ४८ किलो वजन गटात उकृष्ट कामगिरी करत बुलढाणा व सातारा जिल्ह्याच्या खेळाडूंचा पराभव करत कांस्य पदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या पदाधिकारी यांनी तसेच सामाजिक, शैक्षणिक स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे. रोशनी पाटील हिस राकेश माळी, आकाश बोडरे, जितेंद्र माली यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@