विराट सोबतच्या सुंदर सेल्फी नंतर अनुष्काचे 'हे' भयावह पोस्टर होतंय व्हायरल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |

 
 
अनुष्का शर्माने स्वतःच्या कर्तृत्वाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु विराट कोहली सोबत लग्न झाल्यावर तिची लोकप्रियता अधिकच वाढली. त्यांच्या लग्नाचे व लग्नानंतरचे सगळेच फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. अनुष्काने १ जानेवारीला विराट सोबतचा तिचा सेल्फी ट्विटरवर टाकला होता, त्यांनतर थेट आज तिने एक भयावह फोटो शेअर केला आहे. तिचा आगामी चित्रपट "परी"चे टिझरची लिंक देऊन तिने हा फोटो पोस्ट केला आहे. नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अनुष्काच्या या चित्रपटातील तिच्या लूकची व व्यक्तिरेखेची आत्तापासूनच चर्चा होत आहे.
 
 
 
या चित्रपटाची नेमकी कथा टिझरमधून पूर्णपणे लक्षात येत नसली तरी यातून दोन शक्यता मात्र समोर येत आहे. एक म्हणजे ही परीची रिव्हेंज स्टोरी असावी किंवा दुसरं म्हणजे हा एक भयपट असावा. आता यातील नेमकं काय असेल याचा उलगडा ट्रेलर आल्यावर बहुदा होऊ शकेल. आज अनुष्काने पोस्ट केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर एक विद्रुप चेहऱ्याची व्यक्ती अनुष्काच्या मागील बाजूस उभी असलेली दिसत आहे. तर टिझरमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर वेगवेगळे बदल दाखवण्यात आले आहेत. तसेच तिचा चेहऱ्याचे हळहळू होत असलेले विद्रुपीकरण दाखवले आहे. त्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर अनेक घाव झाल्याच्या खुणा आणि रक्त दाखवले आहे.
 
 
 
हा चित्रपट २ मार्च २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रोसित रॉय याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून क्लीन स्लेट फिल्म्स आणि क्रिअर्ज एंटरटेन्मेंट यांची निर्मिती आहे. यामध्ये अनुष्का सोबत परांब्रता चॅटर्जी, रजत कपूर, रिताभरी चक्रवर्ती हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@