१५ जानेवारीपासून चांदा क्लबवर जिल्हा कृषी महोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 
शेतकरी, कृषी प्रेमी व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
 
 
 
चंद्रपूर:  १५ ते १९ जानेवारी २०१८ या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे जिल्हा कृषि महोत्सव, सेंद्रिय शेतमाल विक्री व महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे उदघाटन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते तर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे अध्यक्षतेखाली व सर्व मान्यवरांचे उपस्थित होणार आहे. या कृषी महोत्सवाचा कृषी क्षेत्रातील ज्ञानार्जण, विक्री, खरेदीसाठी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर यांनी केले आहे.
 
या कार्यक्रमामध्ये शेतक-यांना शेडनेट, मूलस्थानी जलसंधारण, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, यांत्रिकीकरण व इतर अनेक योजनांबाबत प्रात्यक्षिक, ट्रॅक्टर व विविध यंत्र (ट्रॅक्टर व बैलचलित), फळ प्रक्रिया पदार्थ, फळ व भाजीपाला प्रक्रियेचे यंत्र, जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती, पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येईल. तसेच हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे प्रात्यक्षिक, मलबेरी व टसर रेशिम प्रात्यक्षिक व माहिती, मत्स्यपालन, मधमाशी पालन प्रात्यक्षिक, ठिंबक व तुषार सिंचन प्रात्यक्षिक यासारखे विविध शेतकरी उपयोगी माहिती देणारे स्टॉल प्रदर्शनीमध्ये उपलब्ध राहतील.
 
सेंद्रिय शेती योजनेंतर्गत तयार झालेले धान्य व बिगर सेंद्रिय शेतीमधील धान्य सुध्दा शेतकरी बांधव विक्रीसाठी ठेवणार आहेत. ज्यांचा लाभ थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेनुसार नागरिकांपर्यंत पोहचवावयाचा आहे. तसेच महिला बचत गटांमार्फत अंगिकृत विविध उपक्रम व साहित्य सुध्दा प्रदर्शित केल्या जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@