पहिल्यांदाच भोपाळ स्थानकावर ‘सैनीटरी नॅपकिन’चे उपकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
भोपाळ: भोपाळ शहरातील रेल्वे स्थानकावर पहिल्यांदाच महिलांसाठी ‘सैनीटरी नॅपकिन’चे उपकरण बसविण्यात आले आहे. देशातील भोपाळ हे पहिले शहर आहे जिथे ‘सैनीटरी नॅपकिन’चे उपकरण बसविण्यात आले आहे. भोपाळ रेल्वे महिला कल्याण संघाकडून हे उपकरण लावण्यात आले आहे.
 
 
महिलांच्या आरोग्याचा विचार करता महिलांना रेल्वे स्थानकावर ‘सैनीटरी नॅपकिन’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय भोपाळ रेल्वे प्रशासनाने घेतला आहे ही खूप महत्वाची बाब मानली जात आहे. देशात भोपाळ हे पहिले रेल्वे स्थानक असले तरी देखील आता देशातील अनेक स्थानकावर ‘सैनीटरी नॅपकिन’चे उपकरण बसविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा. 
 
@@AUTHORINFO_V1@@