कोपर्ली इंदाणी विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
 
 
 
यावेळी मेळाव्याचे उद्घाटन सरपंच प्रकाश चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विकास सोसायटी चेअरमन संदीप बिर्ला, रघुनाथ चौधरी, मुख्याध्यापक एस.एन.पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात विज्ञान व गणित या विषयावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मॉडेल, उपकरणे, तक्ते असे विविध ४१ उपकरणांचे सादरीकरण केले. गावातील अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक श्री.गावीत, श्री.महाजन, श्री.बुवा, श्री.पाटीलसर तसेच गावातील ग्रामस्थांनी मेळाव्याला भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. मेळावा यशस्वीतेसाठी विज्ञान प्रमुख आर.डी.पाटील, संदीप साळुंके, वाय.एम.बेडसे, केतन पटेल, भुषण सोनार, व्ही.पी.देवरे, किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@