आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत भारताचे नाव चमकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 

 
 
 
तुर्की: तुर्की येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्किइंग स्पर्धेत भारताच्या आंचल ठाकूर हिने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकाविले आहे. या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. या स्पर्धेत आंचल ठाकूर हिने कांस्यपदक पदकावर मोहोर लावली आहे. या खेळात पदक जिंकणारी ती पहिलीच स्किइंग महिला ठरली आहे.
 
 
 
 
 
हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी आंचल ठाकूर हिला शुभेच्छा देत तिचे कौतुक केले आहे. तसेच ही देशासाठी अतिशय मानाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुर्कीमधील पैलनडोकेन स्की या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 
 
 
 
 
 
आंचल हीने तिच्या स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचविली आहे. ‘मला जे स्वप्नात देखील वाटले नव्हते ते आज घडले आहे. मी आंतरराष्ट्रीय पदक घेवून उभी आहे मला विश्वास होत नाहीये’ अशा शब्दांमध्ये तिने तिच्या भावना ट्वीटरवर व्यक्त केल्या आहेत.
 
 

 
 
स्किइंग  हा बर्फावरती खेळला जाणारा खेळ आहे ज्यात स्कीजचा वापर केला जातो. स्कीज् बरोबर बूट वापरले जातात. स्किइंग हा खेळ दोन प्रकारात विभागता येतो. नॅार्डिक स्किइंग हा त्यातला सर्वात जुना प्रकार जो स्कँडिनेवियामध्ये सुरु झाला. तर दुसरा प्रकार ॲल्पाइन स्किइंग हा आल्प पर्वतात सुरु झाला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@