जनसामान्यांच्या जीवनात विज्ञानामुळे क्रांती घडवता येईल : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
दिल्ली : देशातील जनसामान्यांच्या जीवनात जर क्रांती घडवून आणायची असेल तर विज्ञानाने आपल्याला क्रांती घडवता येईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. आज प्रसिद्ध गणितज्ञ एस. एन. बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकता येथे आयोजित एका समारंभात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते संबोधित करत होते यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले.
 
 
 
विज्ञान जनसामान्यांच्या जीवनाला सोपे करायचे कार्य करेल तसेच विज्ञानामुळे देशाची प्रगती होईल असेही ते यावेळी म्हणाले. देशातील नागरिकांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी २० नवीन संस्थानांचे निर्माण आम्ही करणार आहोत. या माध्यमातून नागरिकांना आम्ही उच्च शिक्षण तसेच जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
अवकाश क्षेत्रात, तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने मोठे यश संपादन केले आहे. जगभरात भारताचे वैज्ञानिक हे मेहनती आणि हुशार वैज्ञानिक म्हणून ओळखले जातात. आपल्या कामाच्या आणि बुद्धीच्या जोरावर संपूर्ण जगामध्ये भारताच्या वैज्ञानिकांनी आपले नाव उंचावले आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानातील नवीन गोष्टी तरुणांनी शिकणे गरजेचे आहे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. 
 
@@AUTHORINFO_V1@@