आता दिल्लीत देखील 'बलुचिस्तान मुक्ती'चे पोस्टर्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |



नवी दिल्ली : लंडन, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेनंतर आता देशाच्या राजधानीमध्ये देखील 'बलुचिस्तान मुक्तीचे' पोस्टर्स झळकू लागले आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या प्रवक्त्यांकडून हे पोस्टर्स दिल्लीत लावण्यात आले असून २०१८ मध्ये भारतातील सर्व नागरिकांनी मिळून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प केला पाहिजे, असे या पोस्टर्सवर लिहिण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील भाजपचे प्रवक्ते तेजिंदर बग्गा यांनी हे पोस्टर्स दिल्लीमध्ये सर्वत्र लावले असून 'बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या मानवी अधिकाऱ्यांच्या गळचेपी विरोधात सर्व नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे' असे आवाहन या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठींबा दिल्यामुळे बलोच नेत्यांकडून बग्गा यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. तसेच भारतातील नागरिकांकडून देखील बग्गा या कृतीला पाठींबा देण्यात येत आहे व बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने बलोच नेत्यांना सर्व प्रकारची मदत केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनेकांकडून देण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर भारताबरोबरच संपूर्ण जगभरात हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. बलोच नेत्यांनी देखील या विषयी भारताचे आभार व्यक्त करत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने प्रयत्न करावेत, असे म्हटले होते. यानंतर जगभरात विशेषतः युरोपमध्ये या विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये देखील याविषयी जनजागृती मोहिमे राबवण्यात आल्या होत्या.
@@AUTHORINFO_V1@@