'भाजप नेत्यांमुळे संसदेची प्रतिमा खराब' : खर्गे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |




नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी गेल्या शनिवारी संसदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस पक्षाकडून भाजप नेत्यांवर आता जोरदार टीका केली जात आहे. 'भाजप नेत्यांकडून वारंवारपणे केल्या जाणाऱ्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे संसदेची प्रतिमा खराब होत आहे' अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खड्गे यांनी केली आहे. इतर अनेक विषयांवर नाहक बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयी मात्र काहीच का बोलत नाहीत ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
 
तोमर यांनी गेल्या शनिवारी एका सभेमध्ये कॉंग्रेस नेते आणि मोदी यांच्यात तुलना करताना 'पूँछ के बाल और मूछ के बाल' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर खड्गे यांनी आज आपले मत मांडत, भाजपचे वरिष्ठ आणि अनुभवी नेते अशा प्रकारची विधाने सातत्याने करत असून यांच्या या अशा वक्तव्यांमुळे संसदेची प्रतिमा जनसामन्यांमध्ये बिघडत चालली आहे. परंतु पंतप्रधान आपल्या नेत्यांच्या अशा वक्तव्यांवर मात्र काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आता मोदींनी याविषयी स्पष्टीकरण द्यावे' असे खड्गे यांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@