आज नवी मुंबई महानगरपालिकेचा २६ वा वर्धापनदिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
  
नवी मुंबई : स्वच्छ शहरांमध्ये देशात आठव्या व राज्यात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेचा २६ वा वर्धापन दिन आज दि. १ जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न होत असून या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
दि. १ जानेवारी १९९२ रोजी ग्रामपंचायतीमधून थेट महानगरपालिकेत रुपांतर होणारी नवी मुंबई महानगरपालिका हे देशातील एकमेव उदाहरण असून सुरूवातीपासूनच आपले वेगळेपण महानगरपालिकेने जपले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या २६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दि. ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत महानगरपालिका मुख्यालय इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मागील वर्षी रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता शोभिवंत आतषबाजी करण्यात आली होती, ती यावर्षी केली नाही.
 
दि. १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे महापालिका अधिकारी - कर्मचारीवृंदाचे सांस्कृतिक कार्यक्रमसादर होणार असून सकाळी ११ वाजता वर्धापनदिनाचा समारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खासदार राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक, विधानपरिषद सदस्य आमदार नरेंद्र पाटील, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@