अमेरिकेची समजूत काढण्यासाठी पॅलेस्टाईन पाठवणार राजदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |


पॅलेस्टाईन : जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून अमेरिकेने दिलेल्या पाठींब्यासंबंधी अमेरिकेचे मन वळवण्यासाठी लवकरच पॅलेस्टाईन आपला राजदूत अमेरिकेला पाठवणार आहे. पॅलेस्टाईन सरकारकडून नुकतीच या विषयी घोषणा करण्यात आली असून या संबंधी अमेरिकेशी बोलणे देखील चालू असल्याचे पॅलेस्टाईनने सांगितले आहे.

जेरुसलेम हा मुळचा पॅलेस्टाईनचा भाग आहे. त्यामुळे त्यावर इस्राइल सांगत असलेला त्याचा दावा हा पूर्णपणे खोटा आहे, असे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये जेरुसलेमसंबंधी करण्यात आलेल्या करारावर देखील अद्याप पूर्ण चर्चा झालेली नाही. त्यामुळे अमेरिकेशी चर्चा करून जेरुसलेमसंबंधी अमेरिकेने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन त्यांना करणार असल्याचे पॅलेस्टाईनने सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जेरुसलेमला इस्राइलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर जगभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उटली होती. यानंतर संयुक्त राष्ट्रांमध्ये देखील ट्रम्प यांच्या या निर्णयावर मतदान घेण्यात आले होते. यामध्ये भारतासह जगभरातील १२८ देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाला आपला विरोध दर्शवला होता.
@@AUTHORINFO_V1@@