पंतप्रधान, राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : २०१७ चे हे वर्ष संपून आता नवीन वर्षाचे म्हणजेच २०१८ चे आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशबांधवांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे वर्ष सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि नवीन उमेद घेवून येवो अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तुमचे हे वर्ष आरोग्यदायी होवो अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
 
 
 
 
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. २०१८ हे वर्ष सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि नवी उमेद घेवून यावी अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. आज संपूर्ण जग नववर्षाचे स्वागत करीत आहे. काही नागरिक नवीन वर्षात नवीन संकल्प घेत आहेत तर काही नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.
 
देशभरात काल रात्री १२ वाजता नव्या वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. २०१७ ला निरोप देतानाच २०१८ चे जोरदार स्वागत करण्यात आले. रस्ते, दुकाने, मॉल्स, इमारती, उपहारगृहे सजवण्यात आली होती. दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. तसेच बरोबर १२ वाजता विविध शहरांत फटाकेही फोडण्यात आले व नववर्षाचे स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच मंत्र्यांनीही आपापल्या सोशल मिडिया खात्यांवरून जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@