'धमकी नव्हे हे वास्तव' : किम जोंग उन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |

 
 
प्याँगयांग (उत्तर कोरिया) : 'अमेरिकेला वाटत आहे कि, उत्तर कोरिया फक्त अणु बॉम्बची धमकी देत आहे. परंतु उत्तर कोरियाची अणुशक्ती ही फक्त कल्पना अथवा धमकी राहिली नसून ती आता वास्तव बनली आहे' असे प्रदिपादन उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी केले आहे. २०१८ च्या वर्षारंभानिमित्त केलेल्या भाषणामध्ये ते काल बोलत होते.
 
 
 
'अमेरिकेला उत्तर कोरियाच्या शक्तीची कल्पना नाही. उत्तर कोरियाची अणुशक्ती आता वास्तवात उतरली असून देशाच्या सर्व अणुशस्त्रांची कळ ही माझ्या कार्यालयामध्ये आहे' असा सुचक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे अमेरिकेने उत्तर कोरियाला हलकेच घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा याचे परिणाम अत्यंत वाईट होतील, अशी धमकी देखील त्यांनी यावेळी अमेरिकेला व पर्यायाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिली आहे.
 
 
 
याच बरोबर दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या आगामी क्रीडास्पर्धासाठी देखील उन यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उत्तर कोरियाचे प्रतिनिधी मंडळ पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. त्याच बरोबर आपल्या देशातील नागरिकांना यंदाचे हे वर्ष आनंदाचे आणि वैभवाचे जावो, अशा शुभेच्छा देखील उन यांनी यावेळी दिल्या.
@@AUTHORINFO_V1@@