केडीएमसीच्या मुख्यालयातील अग्निशमन यंत्रणा दोन वर्षापासून बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 
 
 
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे सभागृह काही महिन्यांपूर्वी कोसळले होते. त्याचा अहवाल अद्यापही सादर करण्यात आला नाही. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशमन यंत्रणा कार्यन्वित करणे अपेक्षित असताना मुख्यालयाच्या इमारतीत असलेली अग्निशमन यंत्रणा दोन वर्षे बंद असल्याने स्थायी समिती सदस्यांच्या वतीने प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
 
सदस्य राहुल दामले यांनी सभागृह कोसळण्याची कारणे अजून समोर आली नाही त्याबाबतचा अहवाल अजून सादर करण्यात का करण्यात आला नाही आणि अग्निशमन यंत्रणा चालू आहे की नाही असा प्रश्न विचारला यावर अग्निशमन विभागाच्या वतीने दोन वर्षा पूर्वी सुरू होती मात्र सध्याचे याबाबत कल्पना नसल्याचे नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर सदस्य संतापले, शहरातील इमारतींना एनओसी देताना आपण तपासणी करतो मात्र मुख्यलयातील यंत्रणा बंद असल्यास संबंधित विभागाला नोटिस बजवण्याची मागणी सदस्य दीपेश म्हात्रे यांनी केली तसेच सभापतींच्या वतीने पालिकेतील स्वछतेची जबाबदारी बाबत ही सवाल करण्यात आला. यावेळी शहर अभियंत्यांमार्फत ही स्वछता वेगवेगळ्या विभागातर्फे केली जात असल्याचे सांगण्यात आले.
 
मुंबई दुर्घटनेतील मुलांना श्रद्धांजली
लोअर परेल येथे झालेल्या अपघातात १४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. याच धर्तीवर केडीएमसी स्थायी समिती सभापती सदस्य व अधिकार्‍यांच्या वतीने त्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
@@AUTHORINFO_V1@@