विश्वासघातकी पाकिस्तानला आता मदत नाही : ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 
 
 
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. अमेरिका येथून पुढे पाकिस्तानला कोणतीही आर्थिक तसेच लष्करी मदत आता करणार नाही असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.अमेरिकेच्या मदतीच्या बदल्यात पाकिस्तान कायमच अमेरिकी नेतृत्वाशी खोटेच बोलत आल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे.
 
 
 
अमेरिकेने आजपर्यंत गेल्या १५ वर्षांत मूर्खासारखे सुमारे ३३ अब्ज डॉलर पाकिस्तानला मदत म्हणून दिले. मात्र पाकिस्तानने त्या बदल्यात अमेरिकी नेतृत्त्वाला मूर्ख समजून थापा आणि फसवणूक यांनीच त्या मदतीची परतफेड केली असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
 
 
अमेरिका ज्यांच्या विरोधात कारवाई करत आहे अशा अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांना लपण्यासाठी पाकिस्तानने सुरक्षित जागा उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे तर त्यांची मदतही केली. अमेरिका आता हा विश्वासघात कदापि सहन करणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. येथून पुढे अमेरिका पाकिस्तानला कोणतीही आर्थिक अथवा लष्करी मदत करणार नाही असेही ट्रम्प यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@