अल्पवयीन मुलीला फसवून एक लाखांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |

 पोलिसांकडून आरोपीला अटक

 
 
 
 
 
कल्याण : एका अल्पवयीन मुलीबरोबर फेसबुकवर मैत्री करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत ते फोटो पीडित मुलीच्या बहिणीला दाखवण्याची धमकी देत या पीडित मुलीकडे तब्बल एक लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे.
 
या प्रकरणी पीडित १७ वर्षीय मुलीने टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. हृतिक पवार उर्फ संजय घोडगे उर्फ शामराणे असे या विकृत तरुणाचे नाव असून पीडित १७ वर्षीय मुलगी डोंबिवली पूर्व परिसरात राहते. तिची काही महिन्यांपूर्वी आरोपीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आरोपीने या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्याचे अश्लील छायाचित्र काढले. काही दिवसांपूर्वी हे छायाचित्र मुलीला पाठवत आरोपीने एक लाखाची मागणी केली, मागणी पूर्ण न केल्यास सदर छायाचित्र तिच्या बहिणीला पाठवण्याची धमकी दिली.
 
यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने थेट टिळकनगर पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली असून तक्रारी नुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@