तळोदा नगरपालिका उपनगराध्यक्षपदी भाजपच्या भाग्यश्री योगेश चौधरी पांच मतांनी विजयी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 
 
 
 

स्वीकृत सदस्य भाजपाचे हेमलाल पुरुषोत्तम मगरे व काँग्रेसचे जितेंद्र लक्ष्मण माळी यांची निवड

 
 
नंदुरबार : तळोदा नगरपालिकात भाजपा लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी व ११ नगरसेवक व काँग्रेसचे सहा तर शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. शासन परिपत्रक २०१६ अन्वये उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदासाठी निवडीची प्रक्रिया आज झाली. आज विशेष सभा पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. उपनगराध्य पदासाठी भाजपातर्फे सौ. भाग्यश्री योगेश चौधरी व काँग्रेसतर्फे सौ. अनिता संदीप परदेशी यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. निवडणूक झाली, हात उंचावून मतदान झाले, त्यात सौ. भाग्यश्री योगेश चौधरी यांना ११ मते, सौ. अनिता संदीप परदेशी ६ मते मिळाली, तर शिवसेना नगरसेविका सौ. प्रतीक्षा ठाकूर तटस्थ भूमिका घेतली.
 
 
 
स्वीकृत सदस्य पदा दोन जागेसाठी भाजपातर्फे हेमलाल मगरे व योगेश चौधरी यांचे अर्ज दाखल केले होते. तर गटनेत्यातर्फे हेमलाल मगरे यांच्या शिफारस दिल्याने हेमलाल मगरे स्वीकृत नगरसेवक निवड घोषित केले. तर काँग्रेस तर्फे जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांचे एकमेव अर्ज दाखल झाला होता. स्वीकृत सदस्य म्हणून भाजपाचे हेमलाल मगरे व काँग्रेसचे जितेंद्र सूर्यवंशी यांनी निवड झाली दोन्ही गतातर्फे फटाके आतिषबाजी करण्यात आली. सभेला गटनेते भास्कर मराठे, रामानंद ठाकरे सुरेश पाडवी, योगेश पाडवी, अमणोद्दीन शेख अंबिका शेंडे, बेबीबाई पाडवी, सुनयना उदासी, शोभाबाई भोई, सविता पाडवी आदी तर काँग्रेसचे नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, सौ. कल्पना पाडवी, सौ. अनिता परदेशी, हितेंद्र क्षत्रिय आदी शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर आदी सभेला उपस्थित होते.
 
 
यावेळी भाजपाचे कुकरमुंडा माजी उपसरपंच भास्कर बांडे, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, प्रदीप शेंडे, योगेश चौधरी, जालिंदर भोई, माजी नगरसेवक हिरालाल पाडवी, गोकुळ पवार, जगदीश परदेशी, माजी नगरसेवक प्रल्हाद पाडवी, कैलास चौधरी, नितीन पाडवी व भाजप कार्यकर्ते तर काँग्रेसचे माजी नगरसेवक सतीवान पाडवी, संदीप परदेशी, योगेश मराठे, रोहन माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@