आशिया खंडात मोठ्या उत्साहात 'नववर्षाचे स्वागत'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
२०१७ चे हे वर्ष संपून आता नवीन वर्षाचे म्हणजेच २०१८ चे आगमन झाले आहे. अनेक कटू आणि मधुर आठवणींना विसरून सर्व भारतीय नागरिकांनी नववर्षाचे स्वागत केले आहे. पौर्वात्य देश आणि आशिया खंडामध्ये नव वर्षाचे जोमाने स्वागत करण्यात आले आहे जपान, कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंडसह सर्व आशियाई देशांनी मोठ्या उत्साहात २०१८ चे स्वागत केले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर सर्व आशियाई देशांच्या नेत्यांनी देखील आपापल्या तसेच त्यांच्या देशातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
न्यूझीलंड : ऑस्ट्रेलिया खंडापासून पूर्वेकडे असलेल्या न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. न्यूझीलंडच्या राजधानीमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
 
 
 
ऑस्ट्रेलिया : न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियामध्ये देखील मोठ्या उत्सवात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'सिडनी' या शहरामध्ये नागरिकांनी प्रचंड उत्साहात नववर्षाचे स्वागत केले.
 
 
 
 
जपान : आशियाई देशांमध्ये सर्वात प्रथम सूर्योदय होणाऱ्या जपानमध्ये देखील नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
 
उत्तर कोरिया : संपूर्ण वर्ष अमेरिकेसह संपूर्ण जगाला आपली दहशत दाखवणाऱ्या उत्तर कोरियाच्या राजधानीमध्ये देखील अत्यंत नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी करत नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. 
 
@@AUTHORINFO_V1@@