वाशीमच्या सायकलस्वारांचा अनोखा उपक्रम

    28-Apr-2017
Total Views |

 

वाशीममधील सायकलस्वार ग्रुप या गटातील सायकलस्वारांनी काल एक अनोखा उपक्रम साजरा केला. ग्रुपच्या सायकलस्वारीला शंभर आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काल या गटाने वाशिम ते पातूर असे १०० किलोमिटरचे अंतर सायकलवर पार केले. तसेच या प्रवासा दरम्यान त्यांनी रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता सुरक्षतेचा संदेश देखील दिला. सायकलस्वारांच्या या कार्याचे सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे.


वाशीम शहरातील ३० युवक आणि ३ महिलांचा या ग्रुपमध्ये समावेश आहे. हे सर्वजण प्रत्येक रविवारी सायकलिंगच्या माध्यमातून समाजाला निरोगी आणि नेहमी व्यायाम करण्याचा संदेश देत आहेत. गेल्या रविवारी त्यांनी आपला १०० वा रविवार साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी समाजाला आणखी एक संदेश देण्यासाठी हे अभियान राबविण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी काल वाशीम ते पातूर हे १०० किमीचे अंतर पार करत, रस्त्यातील खड्डे बुजवले.


या वाशीम सायकलस्वार ग्रुपने आतापर्यत वाशीम ते लालबाग, वाशीम ते कन्याकुमारी असे अंतर कापले आहे. तसेच फ्रान्स येथील ब्रेवेट स्पर्धेत देखील वाशीमचे नाव चमकवले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.