पणजी मार्गावर आता शिवनेरी सेवा सुरु

    27-Apr-2017
Total Views |

उन्हाळ्यात गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचा आणि कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाश्यांना सुखाने प्रवास करता यावा या उद्देशाने राष्ट्रीय परिवहन महामंडळातर्फे २५ एप्रिलपासून मुंबई सेंट्रल ते पणजी मार्गावर शिवनेरी वातानुकुलीत सेवा सुरु करण्यात आली आहे. सदर बस मुंबई सेंट्रलहून रात्रौ ८ वाजता सुटणार असून ही बस सेवा ५७४ किमीचा प्रवास करणार आहे. या बसचा मार्ग प्रामुख्याने दादर – कुर्ला नेहरू नगर – मैत्री पार्क – वाशी हायवे – नेरूळ – बेलापूर – पनवेल – महाड – चिपळूण – हातखंबा - लांजा – राजापूर – कणकवली – कुडाळ – सावंतवाडी – म्हापसा मार्गेपार पाडून मग पणजी असा असणार आहे. ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. मुंबई सेंट्रल ते पणजी याचे प्रवास भाडे रु. १४६० आकारण्यात येईल. तर पणजीहून मुंबई सेंट्रलला परतणारी बस पणजीहून संध्याकाळी ५:३० वाजता सुटेल आणि चिपळूण मार्गेच मुंबईला सकाळी ५ वाजता पोहोचेल.
उपरोक्त बसचे संगणकीय आरक्षण महामंडळाच्या
https://public.msrtcors.com/ticket_booking/ ह्या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध असून प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.

या बस चा तिकीट दर खालीलप्रमाणे असेल :

  • मुंबई ते पणजी: १४६० रु.
  • मुंबई ते सावंतवाडी: १३५९ रु.
  • मुंबई ते कणकवली: १२१७ रु.
  • मुंबई ते राजापूर: १०५९ रु.
  • मुंबई ते चिपळूण: ७११ रु.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.