पालघर खाडीला प्रदुषणाचा विळखा

    27-Apr-2017
Total Views |


पालघर खाडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये पालघर परिसरातील प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आाल आहे. पालघर खाडीमध्ये झालेल्या प्रदुषणामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. पाण्यात साचलेला गाळ, जलपर्णी यामुळे खाडीचे पात्र दिसेनासे झाले आहे. यामुळे पालघर मधील रहिवाशांना दररोजच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


पालघरमधील माहूल गाव येथे प्रदुषणाचा विळखा आजूबाजूच्या परिसरालाही बसला आहे. तसेच या ठिकाणी कचरा आणि माती मोठ्या प्रमाणावर साचल्याने खाडीतून पाणी वाहण्याची क्षमता कमी झाली आहे.


सद्यस्थितीत पालघर येथे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. आजूबाजूच्या परिसरात नवनवीन फॅक्टरी, कारखाने निर्माण झाले आहेत. त्यामुळे या कारखान्यातील रसायने खाडीतील पाणी दुषित झाले आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. पालघरमधील प्रदुषण दाखवणार ही व्हिडिओ....

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.