वाघा बॉर्डरनंतर दुसरा उंच ध्वजस्तंभ या शहरात

    27-Apr-2017
Total Views |


तब्बल ३०३ फूट उंचीचा ध्वजस्तंभ आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला आहे. देशाच्या वाघा बॉर्डर या ठिकाणी असलेल्या ध्वजस्तंभानंतरचा हा दुसरा उंच ध्वजस्तंभ असणार आहे. कोल्हापूरचा पर्यटनाच्या दृष्टीने नियोजनपूर्वक विकास सध्या करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या पोलिस मुख्यालयाचा परिसर सुशोभित करून त्या बागेत हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.

येत्या १ मे ला या स्तंभाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. यासाठी या परिसराची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली.

कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहु छत्रपती शाहु महाराज यांनी जी स्थळे विकसीत केली त्यानंतर आजपर्यंत पर्यटनाच्या दृष्टीने फारसा विकास झाला नाही. असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केला जात आहे. केएसबीपीच्या माध्यमातून शहरातील रोड डिव्हायडर आणि चौक सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होत असून शहराला देखणे रुप येत आहे. पोलीस मुख्यालयाच्या गार्डनचे मुख्य आकर्षण हा ३०३ फुट उंचीचा ध्वजस्तंभ व त्यावर सदैव डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज हा असणार आहे. वाघा बॉर्डरवरील ध्वजस्तंभानंतरचा हा देशातील दुसरा सर्वात उंच ध्वजस्तंभ असणार आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.