मनप्रीत कौरला गोळाफेकीत सुवर्णपदक

    26-Apr-2017
Total Views |

 

भारताची शॉटपुटर मनप्रीत कौर हिने एशियाई ग्रँड प्रिक्स एथलेटिक्स स्पर्धेमध्ये गोळाफेकीत एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याच बरोबर येत्या ऑगस्ट महिन्यात लंडनमध्ये होणाऱ्या आईएएएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी देखील ती पात्र ठरली आहे.


आईएएएफ स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीयांसाठी घेण्यात आलेल्या सत्राच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मनप्रीतने १८.८६ मीटर अंतरापर्यंत गोळा फेकून नवा राष्ट्रीयविक्रम प्रस्थापित केला आहे. या अगोदरचाही राष्ट्रीय विक्रम मनप्रीतच्याच नावावर होता. यास्पर्धेत प्रवेश मिळविण्यासाठी महिलांना १७.७५ मीटर अंतरापर्यंत गोळाफेक करणे गरजेचे असते. या पात्रता फेरीत मनप्रीतने चीनच्या बियान सोंग हिला मागे टाकत सुवर्ण पदकाचा बहुमान पटकावला. मनप्रीतने आपल्या स्वतःचाच विक्रम मोडीत काढत १८.८६ मीटरपर्यंत गोळा फेक करुन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. यानंतर चीनची बियान सोंग हिने १७.९६ मीटर अंतरावर गोळाफेक करत स्पर्धेतील दूसरा क्रमांक पटकावला.


मनप्रीत ही मुळची पंजाबची असून या अगोदर मनप्रीतने २०१५ मध्ये १७.९६ मीटर गोळाफेकीचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तसेच राष्ट्रीय स्तरावर झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये तिने गोळाफेकीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.