वसईतील अनाधिकृत रिसॉर्ट्स विरोधात राष्ट्रवादीचा 'हल्लाबोल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |

पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन



वसई : मुंबईतील अनधिकृत हॉटेल्सवर होत असलेल्या कारवाईनंतर आत वसईतील देखील सर्व अनाधिकृत हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आज वसई अपर पोलीस अधिक्षकांचा कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. वसईतील या अनधिकृत गेल्या अडीच वर्षांमध्ये वसईतील अनधिकृत रिसॉर्ट्समध्ये अनेक बेकायदेशीरकृत घडत असून देखील प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप देखील यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला.

कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेलला आग लागून १४ जण मृत्यूमुखी पडल्यानंतर शासन जागे झाले आणि मुंबईतील अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. मात्र वसई भागातील रिसॉर्ट्स मध्ये मागच्या अडीच वर्षात जलतरण तलावात १३ जणांचा मृत्यू झाला. सन २०१५ ते २०१७ मध्ये ३२ बलात्कार, ७ खून, अनैतिक मानवी वाहतूकीच्या (पिटा) ५ केसेस आणि कित्येक आत्महत्याही घडल्या आहेत. तरी देखील येतील स्थानिक प्रशासनाकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून यामुळे येथील गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष गोविंदा यल्लाप्पा गुंजाळकर यांनी केला. तसेच यामुळे वसईच्या सांस्कृतिक प्रतिमाला धोका निर्माण होत असून यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे देखील ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@