जोपर्यंत संघ अजिंक्य, तोपर्यंत लढा अपूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |

संघ-भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र या

जिग्नेश-उमरचे विरोधकांना आवाहन




पुणे : 'भारतीय जनता पक्षाची मूळ विचारधारा ही संघाप्रेरित आहे, त्यामुळे जो पर्यंत संघ अजिंक्य आहे, तो पर्यंत आमचा लढा अपूर्ण आहे' अशी प्रतिकिया गुजरातचा नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालिद याने आज दिली. पुण्यातील शनिवारवाडा येथे भीमा-कोरेगाव युद्धाच्या द्विशतक पुर्तीनिमित्त आयोजित 'एल्गार परिषदे'त हे दोघे बोलत होते.

'मोदी, भाजप आणि संघ हे या देशामध्ये पुन्हा एकदा मनुवाद आणू इच्छित आहेत, त्यामुळे येत्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभूत करणे हे अत्यंत गरजेचे आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे.' असे आवाहन मेवाणी याने केले. तसेच निवडणुकीमध्ये कोण जिंकतो याला महत्त्व न देता, 'फक्त भाजपचा पराजय' या एकाच गोष्टीला सर्वांनी जास्त महत्त्व दिले पाहिजे' असे देखील त्याने यावेळी म्हटले.

याचबरोबर देशात अजूनही जातीयवाद हा मोठ्या प्रमाणात असून समाजातील काही विशिष्ट जातीच्या लोकांनीच तो अजून पोसलेला आहे, असे त्याने म्हटले. त्यामुळे भीमा-कोरेगावच्या युद्धमधून देशातील बहुसंख्य जनतेनी प्रेरणा घेऊन देशात नव्याने निर्माण होऊ घातलेल्या या पेशवाई विरोधात एकत्र आले पाहिजे, असे त्याने यावेळी म्हटले. तसेच संघ आणि भाजपने यापुढे संविधानाला विरोध केला, तर नागपूर मध्ये येऊन 'क्रांतीचा एल्गार' करू असे देखील मेवाणीने यावेळी म्हटले.


देशात इस्लाम मनुवादामुळे पसरला - उमर खालिद

'भाजप आणि संघ हे देशातील मुस्लिमांचा सातत्याने विरोध करत आले आहेत, त्यांच्या मते मोगलांनी तलवारीच्या बळावर इस्लामचा प्रसार केला आहे. परंतु मोगलांनी इस्लामचा कसल्याही प्रकारचा प्रसार केलेला नसून मनुवादाच्या संकुचित विचारांमुळे अनेकांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता,' असा अजब ऐतिहासिक तर्क उमर खालिद याने यावेळी मांडला. तसेच संघ आणि भाजपवाले आपल्या संकुचित वृत्तीचे खप्पर नेहमी मोगलांवर फोडत राहतात असा आरोप त्याने यावेळी केला. देशात घडलेल्या अनेक घटनांची माहिती देत देशात अजून ही उच्च-नीच असे भेद पळत असून त्याला काही विशिष्ट वर्गातील लोकच याला जबाबदार असल्याचे पटवून देण्याचा देखील त्याने यावेळी प्रयत्न केला.
@@AUTHORINFO_V1@@