ठाणे महानगरपालिकेची कर व पाणी वसुली कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |
 
 
 
 
ठाणे : नागरिकांना ३१ मार्चच्या आधी मालमत्ता कर आणि पाणी देयकांची रक्कम भरणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेची कर वसुली आणि पाणीपट्टी कार्यालये ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची रक्कम नागरिकांना वेळेत भरता यावी, यासाठी महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालये व उप प्रभाग कार्यालये दुसरा आणि चौथा शनिवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते सायं. ५.४५ या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहेत.
 
 
तसेच रविवारी सर्व प्रभाग कार्यालयातील कर आणि पाणीपट्टी वसुली विभाग सकाळी १०.३० ते दुपारी २.०० (अर्धा दिवस) या वेळेत सुरु राहणार आहेत. तथापि शुक्रवार दि. २ मार्च, २०१८ रोजी धुलीवंदन असल्यामुळे सर्व प्रभाग कार्यालये बंद राहणार आहेत. तरी सर्व मालमत्ताधारक आणि नळ संयोजनधारक यांनी आपला कर वेळेत भरुन महापालिकेस सहकार्य करावे आणि कारवाईची अप्रिय घटना टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@