उत्तर कोरियाला तेल पुरवठा करणारे जहाज जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |




सोअल :
संयुक्त राष्ट्रांकडून बंदी घातलेले असताना देखील उत्तर कोरियाला समुद्र मार्गे तेल घेऊन जात असलेले एक जहाज दक्षिण कोरियाने जप्त केले आहे. हे जहाज तैवानमधील असून तैवानमधील एका कंपनीच्या आदेशावरून हे तेल उत्तर कोरियाला घेऊन जात असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान हे जहाज आता दक्षिण कोरियाच्या ताब्यात असून यासंबंधीची माहिती संयुक्त राष्ट्रांना देण्यात येणार आहे.


दक्षिण चीनी सागरमार्गे हे जहाज उत्तर कोरियाच्या दिशेने निघाले होते. याच वेळी सागरामध्ये गस्त घालत असलेल्या दक्षिण कोरियाच्या नौदलाने या जहाजाला अडवून चौकशी केली असता. हजहाजामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चे तेल असल्याचे आढळून आले. तसेच हे तेल तैवानहून उत्तर कोरियाकडे जात असल्याची माहिती चौकशीमध्ये कोरियाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर ही माहिती दक्षिण कोरियाच्या सरकारला कळवण्यात आली व हे जहाज ताब्यात घेण्यात आले.

गेल्या तीन दिवसांपूर्वी अमेरिकेने देखील चीनहून उत्तर कोरियाला तेल पुरवठा करत असलेल्या एका जहाजाची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियाला होणाऱ्या तेल पुरवठ्यावर बंदी घातलेली असताना देखील चीनकडून होणाऱ्या या तेल पुरवठ्यावर अमेरिकेने चांगलीच आगपाखड केली होती. 'चीनच्या अशा वागणुकीमुळे उत्तर कोरियाची समस्या कधीच सुटणार नाही' अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली होती. 
@@AUTHORINFO_V1@@