थलायवा राजकारणात, नव पक्ष स्थापण्याची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |
 
 
तामिळनाडू :  तामिळ जनतेसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करण्याची आज घोषणा केली आहे. तसेच, येत्या  २०२१ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागा लढवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय सर्व जागांवर आपल्यालाच निश्चित विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे. 
 
 
 
गेल्या अनेक दिवसांपासून रजनीकांत राजकारणात येणार असे संकेत दिसून येत होते. मात्र यावर शिक्कामोर्तब झाला असून रजनीकांत आता राजकारणात उतरणार आहेत असे स्पष्ट झाले आहे. 
श्री राघवंद्र कल्याण मंडपात आयोजित कार्यक्रमात रजनीकांत यांनी घोषणा केली. सध्या लोकशाही चुकीच्या वळणावरून जात असून राजकारणात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बाकीचे राज्य आपली (तामिळनाडू) खिल्ली उडवत आहेत. अशावेळी हा निर्णय घेऊन तामिळनाडूच्या जनतेसाठी कार्य करणे ही माझी जबाबदारी आहे, असे मत त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. "मी प्रसिद्धीसाठी नाही तर तामिळनाडूच्या जनतेसाठी राजकारणात प्रवेश करत आहे." असंही ते यावेळी म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@