पुलवामात सीपीआरएफ प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला, ३ जवान जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |

 
 
पुलवामा :  पुलवामातील अवंतीपोरा येथील लेथापोरा सीपीआरएफ प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी रात्री २ वाजून १० मिनिटांनी हल्ला केला. या हल्ल्यात ३ जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
 
 


तीन दहशतवाद्यांनी सीपीआरएफच्या तळावर प्रवेश करून अंदाधुंद गोळीबार केला. अशा प्रकारच्या आणखी एका हल्ल्याची शक्यता असल्याचे सीपीआरफकडून सांगण्यात आले आहे. दहशतवादी व सुरक्षादलातील चकमक अद्याप सुरू आहे.

दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवानांनी देखील या हल्लाला चोख प्रत्यूत्तर देत गोळीबार केला. गेल्या २३ डिसेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या रजौरी येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले होते.
@@AUTHORINFO_V1@@