'तिहेरी तलाक'नंतर आता 'मेहरम'प्रथा देखील बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |


नवी दिल्ली : मुस्लीम महिलांच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणणारी तिहेरी तलाक प्रथा बंद केल्यानंतर आता हज यात्रेसाठी मुस्लीम महिलांना आवश्यक असलेल्या 'मेहरम'ची प्रथा देखील भारत सरकारने बंद केली आहे. त्यामुळे यापुढे मुस्लीम महिलांना स्वतंत्रपणे हज यात्रा करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 'मन कि बात' या कार्यक्रमात सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयाची माहिती दिली.

मोदी म्हणाले कि, भारतामध्ये गेल्या ७० वर्षांपासून 'मेहरम' ही प्रथा सुरु होती. या प्रथेनुसार भारतातील एखाद्या मुस्लीम महिलेला हज यात्रा करण्याची इच्छा असेल तर तिला तिच्या सोबत एखादा पुरुष रक्षक अर्थात मेहरम सोबत घेऊन जाणे बंधनकारक होते. त्यामुळे इच्छा असून देखील अनेक मुस्लीम महिलांना हज यात्रा करता येत नव्हती. विशेष म्हणजे भारत वगळता इतर सर्व देशांमध्ये ही प्रथा अमान्य आहे, परंतु भारतामध्ये गेल्या अनेक दशकांपासून ही प्रथा सुरु होती. त्यामुळे भारत सरकारने यावर कारवाई करत ही प्रथा नष्ट करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली. व ही प्रथा देखील आता नष्ट केली आहे. त्यामुळे भारतातील देखील मुस्लीम महिला आता यापुढे स्वतंत्रपणे हज यात्रा करू शकतात, असे त्यांनी सांगितले.


तसेच सरकारच्या या निर्णयानंतर संपूर्ण देशभरातून १३०० हून अधिक मुस्लीम महिलांनी पुढील वर्षीच्या हज यात्रेसाठी आपली नावनोंदणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. देशातील हा सकारात्मक बदल अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे भारतीय मुस्लीम महिला अधिक सक्षम होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यंदाचे हे वर्ष मुस्लीम महिलांसाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे असेच गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लीम महिल्यांच्या शोषणाचा मुख्य मुद्दा बनलेल्या 'तिहेरी तलाक' या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालून ही प्रथा अवैध्य ठरवली. यानंतर भारत सरकारने 'तिहेरी तलाक'वर नवीन कायदा अस्तित्वात आणत त्याला लोकसभेत बहुमताने मंजुरी मिळवून दिली. आता वर्षाअखेर 'मेहरम' प्रथा देखील बंद झाल्यामुळे भारतीय मुस्लीम महिलांना यापुढे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि समानता अनुभवता येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@