नवभारताची धुरा युवापिढीच्या खांद्यावर - पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |
 
 
मन की बात कार्यक्रमात नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली :  नवीन भारतातील युवा पिढी ऊर्जावान आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवक हे खूप उर्जावान आणि संकल्पपूर्ण असल्यामुळे नवीन भारताची धुरा याच युवा पिढीच्या खांध्यांवर आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.  तसेच या युवकांच्या उर्जावान आणि कौशल्य विकासांमुळे नवभारताचे स्वप्न साकार होणार असल्याचा विश्वासही यावेळी मोदींनी व्यक्त केला. मन की बात या कार्यक्रमाच्या या वर्षाच्या शेवटच्या कार्यक्रमात जनतेशी समवाद साधताना ते आज बोलत होते. 
 
 
 
 
 
 
ज्या मुलांचा २१ व्या शतकातील जन्म आहे म्हणजेच २००० सालचा जन्म आहे ते जानेवारी २०१८ पासून वयाच्या १८ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत त्यामुळे ते मतदानासाठीही पात्र ठरणार असल्याचेही यावेळी मोदींनी सांगितले. तसेच या भारताच्या नवीन मतदारांचे त्यांनी स्वागतही केले.
१८ ते २५ वयोगटातील युवकांसाठी भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संसदीय सभा आयोजित करु शकतो का, असा प्रश्नही मोदीं उपस्थित केला. संसद सभा यासाठी की हे युवक या सभेत नवभारतासाठीच्या संकल्पनांवर विचारमंथन करु शकतील किंवा विविध योजनांच्या आधारे आपण आपल्या संकल्पांना २०२२ च्या आधीच पूर्ण करु शकू. म्हणजेच यातून आपल्या स्वातंत्र्यसेनीनींनी पाहिलेल्या त्यांच्या स्वप्नातील भारत आपण साकार करु शकू असेही ते म्हणाले.
 
 
 
येशू ख्रिस्त यांचे स्मरण :

नाताळच्या निमित्ताने येशू ख्रिस्तांच्या मूल्यांचे स्मरण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येशूंनी त्यांच्या आयुष्यात सेवा भावनेला जास्त महत्व दिले, या सेवा भावनेचाच सार बायबल ग्रंथातही बघायला मिळतो, असेही मोदी म्हणाले.
 
 
 
मानवसेवी हीच ईश्वरसेवा :

गुरुदेव रामकृष्ण परमहंस यांच्या 'शिव भाव से जीव सेवा करे' या शब्दात मानवसेवेचा संदेश मोदींनी दिला, तसेच मानवसेवा ही संपूर्ण विश्वाचे समान मूल्य आहे असे सांगत महापुरुषांचे स्मरण करत आपली ही महान मूल्य परंपरा नव्या उर्जेने जपत पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
 
गुरु गोविंद सिंग यांचे जयंतिवर्ष :

२०१७ हे गुरु गोविंदसिंग यांचे ३५० वे जयंतिवर्ष आहे. गुरु गोविंदसिंग एक गुरु, कवी, महान योद्धा होते. त्यांच्या जीवनात ते कायम अन्यायविरुद्ध लढले, त्यांनी जातपात न मानण्याची शिकवण दिली, या सगळ्यामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यात खूप काही गमवावे लागले मात्र तरीही त्यांनी द्वेषाला आयुष्यात स्थान दिले नाही, आयुष्यात प्रत्येक क्षणी त्यांनी प्रेम, त्याग आणि शांतीचा संदेश दिला, गुरु गोविंद सिंग यांचे साहस आणि त्यागाने भरलेले जीवन आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे असेही मोदींनी सांगितले.
तसेच यावेळी ते म्हणाले की, आपण जेव्हा नवभारताबद्दल बोलतो, तेव्हा जातीयवाद, सांप्रदायवाद, दहशतवाद आणि भ्रष्टाचारमुक्त भारत आणि गरीबीमुक्त भारत असा अपेक्षीत आहे, त्यामुळे नवभारत म्हणजे जिथे सर्वांसाठी समान संधी तसेच शांती, एकता आणि सद्भावना ही मूल्य सर्वांमध्ये असतील असा नवभारत घडवायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
तसेच आज युवकांपुढे खूप वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, कौशल्य विकासापासून उद्योजकता आणि विविध उपक्रमातून युवापिढी पुढे येऊन यशस्वी होत आहे. त्यामुळे या न्यू इंडिया यूथला एकाच ठिकाणी सगळ्या विषयांची माहिती मिळण्यासाठी काही व्यवस्था करता येऊ शकेल का की जेणेकरुन १८ वर्षांतचे झाल्यानंतर त्यांना सगळी माहिती सहजरित्या मिळू शकेल, असेही ते म्हणाले.
अनेक व्यक्ती आपल्या योग्येतनुसार लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याते पहायला मिळत आहे. मग हाच तर नवभारत आहे, ज्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करत आहोत, याच छोट्या छोट्या गोष्टीतून आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत, असे सांगत आणि सकारात्मक भारत आणि प्रगतशील भारतासाठी एकत्र पुढे जाण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी सगळ्यांना केले.
 
 स्वच्छ भारत अभियानात जन सहभाग महत्वाचा : 
२ ऑक्टोबर २०१४ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मजयंतीच्या दिनी त्यांच्या स्वच्छ भारताला पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. स्वच्छतेच्या दृष्टिने देशभरात व्यापक स्तरावर पआयत्न होत आहेत, ग्रामीण आणि शहरी भागातही जनसहभागातून बदल दिसयला लागल्याचे मोदी म्हणाले.
२६ जानेवारी २०१८ हा दिन विशेष असणार आहे. या प्रजासत्ताक दिनी सगळ्या अशियाई देशांचे मुख्य नेता अतिथी रुपाने भारताला लाभणार आहेत. हे भारताच्या इतिहासात प्रथमच होणार असून भारतासाठी ही गर्वाची बाब असणार आहे,
त्यामुळे प्रजासत्ताक दिनी काय विशेष घडणार आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@