नववर्ष कार्यक्रमासाठी केडीएमसीकडून मार्गदर्शन व अभिप्राय घेणे अनिवार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |

अनधिकृत कार्यक्रमात सामील न होण्याचे नागरिकांना पालिकेचे आवाहन

 

 
 
डोंबिवली : लोअर परेल भागातील कमला मिल कंपाउंड मधील इमारतीच्या छतावरील पबला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने केडीएमसीच्या वतीने शासकीय मान्यता असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक  करिता अग्निशमन विभागाकडून मार्गदर्शन व अभिप्राय घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाला कळवण्यासाठी महापालिकेच्या जारी करण्यात आलेल्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
शहरात नवीन वर्षासाठीचे औत्सुक्य दिसून येत आहे त्यासाठी ठिकठिकाणी रंगतदार कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा आयोजकांचा मानस आहे. पण शुक्रावारी लोअर परळ येथे झालेल्या अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी हा अभिप्राय घेणे आवश्यक करण्यात आले आहे
 
तसेच अनधिकृत कार्यक्रमात सहभागी न होण्याचे व तेथील प्रवेश व निर्गमन याची माहिती देखील ठेवावी, त्याच बरोबर अग्निशमन, पोलीस यंत्रणा, शासकीय यंत्रणा यांना घटनास्थळी पोहचण्यास काही काळाचा अवधी लागत असल्याने भीती व गोंधळून न जाता प्राथमिक सुरक्षा यंत्रणा वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
 
या क्रमांकावर साधा संपर्क
कल्याण पश्चिमसाठी ०२५१-२२३१०१५५ /२३१५१०१ ,
कल्याण पूर्व साअग्निशमन व जीवसंरक्षण उपाययोजनाठी २३६५१०१/२३६५३७१
डोंबिवली पूर्वेसाठी २४००४४७/२४०९५७७,
डोंबिवली पश्चिमेसाठी २४७०३५७/९००४३४५१०१
@@AUTHORINFO_V1@@