नंदुरबारमध्ये अभाविप तर्फे पाकच्या ध्वजाचे दहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |


नंदुरबार : पाकिस्थान सरकारने कुलभूषण जाधव याला त्याच्या आई व पत्नीची भेट घेत असतांना अमानविय प्रकारे काचेची भिंत घातली याचा निषेध करण्यासाठी नंदुरबार मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पाकिस्थानच्या ध्वजाचे दहन करून निषेध नोंदविण्यात आला.
कुलभुषण जाधव यांच्यावर चुकिचे आरोप लावत पाकिस्थानने त्यांना तरुंगात डांबून ठेवले आहे.तब्बल २२ महिन्यानंतर त्यांची आई व पत्नीशी त्यांची भेट झाली.त्यात पाकिस्थानने अमानविय कृत्य करत सौभाग्याचे लेणे मंगळ सूत्र काढून ठेवायला लावले. मातृभाषेतुन त्यांना  संभाषण करू दिले नाही.या कृतीतून पाकिस्थानचा खरा चेहरा जगाच्या समोर आला.या अमानविय कृत्याचा अभाविपच्या नंदुरबार शाखेने निषेध करत पाकिस्थानच्या झेंडयाचे दहन केले.

याप्रसंगी शहर मंत्री रुपेश पाटील, वृषाली घुगे,निलेश हिरे, पुजा माळी, भुषण सोनवणे, कल्पेश पाटील, हार्दिक वाघेला, सुरेश पावरा, पृथ्वीराज जाधव, रविंद्र माळी, रोहित लोहार, सुनिल कोळी, हर्षल राजपूत, कमलेश सोनार आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@