म्हसा यात्रा ५ दिवासांवर आली तरी रस्त्याचे काम अपूर्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |

मुरबाड ते म्हसा मुख्य रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत !

 
 
 
 
 
 
मुरबाड : मुरबाड तालुक्यात ऐतिहासिक म्हसा यात्रा अगदी ५ दिवसांवर येऊन ठेपली असतानाच मुरबाड ते म्हसा या रस्त्याच्या नूतनीकरण व रुंदीकरणाचे कामगेल्या २ वर्षांपासून सुरु असून ते काही ठिकाणी अपूर्ण अवस्थेमध्ये आहे.
 
त्यामुळे यंदा म्हसा यात्रेकरूंना नाहक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. तरी मुरबाड सार्वजनिक बांधकामखात्यामार्फत या रस्त्याच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती दिली आहे. परंतु ज्या गतीने काम होत आहे त्या प्रमाणात सदर रस्त्यावरून जड वाहने गेल्यास रस्ता ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी जड वाहतूक म्हसा यात्रेच्या कालावधीत या रस्त्यावरून बंद करून त्यांना पर्यायी रास्ता उपलब्ध करावा, अशी मागणी वाहन चालक व नागरिक यांनी केली आहे.
 
तसेच ज्या ज्या ठिकाणी काम चालू आहे ते काम कधी पूर्ण होईल अशी चर्चा मुरबाड ते म्हसा परिसरात सुरु आहे. कारण काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र बांधकाम यंत्रणा सज्ज का नाही? अशा चर्चेला उधाण आले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित लक्ष घालून ज्या ज्या ठिकाणी काम अपूर्ण आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@