पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन

    18-Dec-2017
Total Views |
 

 
  
 
पुणे : पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना खराडी येथील रायसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
 
चंचला कोद्रे या २०१३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदासाठी निवडून आल्या होत्या. त्यानंतर ५ सप्टेंबर २०१३ ते १४ सप्टेंबर २०१४ या कालावधीत त्यांनी महापौरपद भूषवले होते. पुणे महानगरपालिकेत २०१२ मध्ये त्या प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
 
 
त्यांच्यावर सायंकाळी ६ वाजता मुंढवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
 
पुणे भाजप कार्यालयानेही विजयी जल्लोष थांबववा -
 
गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधील निवडणूकांचे निकाल आज सकाळी यायला सुरुवात झाली. दोन्ही राज्यांत भाजप आघाडीवर असल्यामुळे साहजिकच पुणे भाजप कार्यालयामध्येही जल्लोषाचे वातावरण सुरु होते. ठिकठिकाणचे शहर भाजप कार्यकर्ते पुणे कार्यालयात उपस्थित होते व जल्लोष सुरु होता. मात्र माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन झाल्याची वार्ता कार्यालयावर धडकताच वातावरण शांत झाले. भाजप पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला व त्यानंतर जल्लोष थांबवण्यात आला. राजकीय विरोध मृत्यूनंतर समाप्त होतो असा जणू संदेशच एका अर्थाने भाजप शहर कार्यकर्त्यांनी दिला.