#ओवी Live- In tune With tune

    08-Jul-2016   
Total Views |

"हे काय?" खोलीत येताच सुक्कु डोळे मोठे करून म्हणाली. "हे काय नवीनच! गीता! गीता वाचतोस तू?!" हातातली केरसुणी खाली ठेवून सुक्कू टेबलवर बसली.

मंद स्मित करून बोलायाचा माझा प्रयत्न जाम फसला! मी सुक्कुचे हाव भाव पाहून हसत सुटलो! आणि हसतच म्हणालो, "Yes! गीता!"

"कळते का कायी?" तोंड वेंगाडून सुक्कु म्हणाली. 

"कळत थोडं थोडं. प्रयत्न करतो ग!"

"आजोबा म्हणायचे ना गीता, कसले कसले योग अन काय काय! मला तर त्यातले काही काळल नाही."

"अग, आपलं रोजचे जीवन म्हणजे गीता. त्यात काही rocket science नाही. Its simply our day to day life."

"म्हणजे कसं?"

"उम्ममम .... हं! तू परवा माझ्या वाढदिवसाला केक केला होतास. त्या साठी काय काय केलंस सांग?"

"सगळ्यात आधी recipie google केली, आणि youTube वर एक व्हिडीयो पाहून शिकले. त्याप्रमाणे सामान आणून केक केला. झालं!" सुक्कू म्हणाली. 

"एखादी गोष्ट शिकणे म्हणजेच ज्ञान योग. मग कृती, सामान आणून केक करणे, तो झाला कर्म योग. आणि ते सगळं करत असतांना दादाला प्रेमाने भरावयाचा आहे, या भावनेने केलास ना? तो भक्ती योग."

"खरंच की दादा, ह्या तर अगदी रोजच्या गोष्टी झाल्या. मी रोज कॉलेजला जाते शिकते, आणि घरी अभ्यास करते, मित्र-मैत्रिणीनं बरोबर timepass करते हे सगळं ज्ञान योग आणि कर्म योग आहे. पण प्रत्येक गोष्टीत भक्ती येतेच असं नाही हं!"

"अगं, प्रत्येक गोष्ट प्रेमाने, मन लावून करणे म्हणजेच भक्ती. म्हणजे बघ आई तुझा डबा भरते ते कर्म आणि कॉलेजच्या लायब्ररीत तो सणक्या पुस्तकावर शिक्का मारतो ते कर्म. कोणत्या कर्मात प्रेम आहे? भक्तीने म्हणजेच, सेवा भावाने, हृदयातून केलेले काम आनंद देणारे होते. म्हणजे Putting your heart and soul in every activity!

"किंवा वर्गात शिकतांना, उत्सुकते शिवाय, त्या विषयाच्या गोडी शिवाय, शिकण्याच्या उर्मी शिवाय, एका आंतरिक ओढी शिवाय शिकण्यात मजा येते का?  त्या दृष्टीने भक्ती प्रत्येक कृतीचा भाग आहे म्हणण्यापेक्षा गाभा आहे.”

“एकूण काय, तर गीता नुसतं वाचण्यापेक्षा आचरणात आणायची गोष्ट आहे!" माझ्या हातातले पुस्तक काढून माझ्याकडे केरसुणी देत सुक्कू म्हणाली!     


ज्ञानेश्वर म्हणतात - गीता ही कृष्णाची philosophy नाही, कृष्णाचा अनुभव आहे. कृष्णाचं जीवन आहे.  कृष्णापासून अविभाज्य असलेली गीता, कृष्णाची अर्धांगिनी आहे. त्याची पतिव्रता धर्मपत्नी आहे!

 -दिपाली पाटवदकर

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.